चिपळूण : मिरजोळी भोरजेवाडी येथे अतीवृष्टीमुळे घराला भेगा

banner 468x60

चिपळूणमधील मिरजोळी ग्रामपंचायत सदस्या वृषाली राजेश कदम यांच्या घराला अतिवृष्टीमुळे धोका निर्माण झाला असून, घराला भेगा पडल्या आहेत. घराची अशी अवस्था झाल्यामुळे कदम कुटुंबीय सध्या भीतीच्या छायेखाली आहेत.


​मिरजोळीचे सरपंच कासम दलवाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून चिपळूण परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मिरजोळी येथे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

याच अतिवृष्टीमुळे ग्रामपंचायत सदस्या वृषाली राजेश कदम यांच्या घराच्या भिंतींना तडे गेले आहेत. घराची झालेली ही अवस्था पाहता, त्यांना मदतीची नितांत गरज आहे.
​या घटनेमुळे

परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन कदम कुटुंबाला मदत करावी, अशी मागणी मिरजोळीचे सरपंच कासम दलवाई यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *