Breaking News
दापोलीतील विद्यार्थ्यांनी पोक्सो अंतर्गत आरोपींवर कठोर कारवाई आणि विकृत वाहकाला बडतर्फ करण्याची केली मागणी, महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी पोलिसांना निवेदन दापोलीकर सायकलप्रेमींची पंढरपूर सायकल वारी उत्साहात संपन्न, 300 हून अधिक किमीचा सायकल प्रवास करत विठुरायाच्या चरणी नतमस्तक चिपळूण : लावणीसाठी लवकर उठण्याच्या वादातून सुनेकडून 71 वर्षीय सासूला मारहाण; चिपळूणमध्ये गुन्हा दाखल रत्नागिरी : पेन्शन कार्ड अपडेटच्या बहाण्याने 83 वर्षीय ज्येष्ठाची 1.68 लाखांची ऑनलाइन फसवणूक खेड : गोटलवाडीत भूस्खलनाच्या धोक्याची गृहराज्यमंत्री योगेश कदमांकडून पाहणी 19 कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर, मृतांच्या वारसांना 8 लाख, तर घरबांधणीसाठी 2 लाख 60 हजारांची मदत

चिपळूण : बाजारपेठेत हाणामारी, 1 गंभीर जखमी

banner 468x60

चिपळूण शहरातील पेठमाप येथे शिमगोत्सवादरम्यान गर्दीमध्ये धक्का लागल्यानंतर याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या दोघांना बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास बाजारपेठेतील भेंडीनाका येथे घडली. यात एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

📌🅾️ कोकणातील बातम्या पाहण्यासाठी Whatsap Group ग्रुप जॉईन लिंक 

banner 728x90
https://chat.whatsapp.com/CtcDHrY9Kp469qVwLPEqRH


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी रोहित साळुंखे व त्याच्या एका मित्रावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद अक्षय ओतारी (३५, बाजारपूल) यांनी दिली आहे.

पेठमाप येथे गर्दीमध्ये अक्षय ओतारी याचा चुलत भाऊ वरद ओतारी याच्या मित्राला रोहितच्या मित्राचा धक्का लागला. यातून वाद झाला. नंतर तो मिटविण्यात आला.


असे असताना अक्षय, वरद ओतारी व त्याचे नातेवाईक रोहितच्या मित्राला जाब विचारण्यासाठी गेले होते. यातूनच रोहित व त्याच्या मित्राने अक्षय व वरदला मारहाण केली. अक्षयच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *