Breaking News
चिपळूण : सावर्डे रेल्वे स्थानकाच्या विकासाला नवी गती! पादचारी पुलाचे भूमिपूजन, बुकिंग सेंटर आणि रेल्वे थांब्यांसाठी शेखर निकम यांचा पाठपुरावा खेड : बाजारपेठेत वाहतुकीला अडथळा, मालवाहू रिक्षा आणि ट्रकचालकावर गुन्हा दाखल मंडणगडच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांचे श्रमदान, निवळी नदीवर बांधला बंधारा, नूतन विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांचा जलसंवर्धनासाठी पुढाकार दाभोळ : पंचनदी-कोळथरेसाठी रुग्णोपयोगी साहित्य केंद्र सुरू; ग्रामीण रुग्णांना मोठा दिलासा चिपळुण : 99 रुपयांत अस्थिविकार आणि हाडांच्या ठिसूळपणाची तपासणी, अपरांत हॉस्पिटलतर्फे आज विशेष शिबिर!

चिपळूण : असुर्डे येथे प्रवाशाचा रिक्षा चालकावर सुरीने हल्ला

banner 468x60

असुर्डे रेल्वे ब्रिजचे पुढे रिक्षाचे भाडे देण्यावरून वाद झाला असता प्रवासी असलेल्या संशयिताने रिक्षा चालकावर सुरीने हल्ला केला. यात चालक गंभीर जखमी झाला. ही घटना दि. 31 मार्च रोजी सायंकाळी 7.45 वाजता झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अजित तुकाराम

गावणंग (वय ५१ वर्षे, रा. आगवे मधलीवाडी)हे आरोपी प्रवासी विनोद चंद्रकांत कदम (वय 35, एगाव, बौद्धवाडी, ता. चिपळूण) यास रिक्षाने येगाव बौध्दवाडी येथे घेवून जात

असताना रिक्षाचे भाडे देणेवरुन वाद घालुन आरोपी कदम याने फिर्यादी यांना सुरीने मानेचे मागील बाजुस पाठीवर मारुन दुखापत केली. या हल्ल्यात अजित जखमी झाले आहेत म्हणून सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *