चिपळूण शहरातील पेठमाप परिसरात वाशिष्ठी नदी पात्रात बुडून १७ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. बिलाल मुश्ताक पोटे असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. नुकताच बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या बिलालच्या अकाली निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बिलाल हा आपल्या मित्रांसोबत पेठमाप येथील नदीपात्रात आंघोळ व पोहण्यासाठी गेला होता. यावेळी नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने तो अचानक बुडू लागला. मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना यश आले नाही. आरडाओरडा ऐकून स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बिलालला नदीबाहेर काढले.
त्यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. पुढील कार्यवाहीसाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
दरम्यान, बिलाल हा नुकताच बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाला होता. पुढील शिक्षण घेऊन भविष्य घडवण्याची तयारी सुरू असतानाच काळाने त्याच्यावर घाला घातल्याने सर्वत्र शोक व्यक्त होत आहे. त्याचे वडील नोकरीनिमित्त परदेशात असल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













