चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात ऑईल टँकरचा भीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू

banner 468x60

मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात आज, २८ मे रोजी सकाळच्या सुमारास भीषण अपघात घडला. चिपळूणच्या दिशेने येणारा ऑईल टँकर अचानक नियंत्रण सुटल्याने पलटी झाला. या दुर्घटनेत टँकर चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

banner 728x90

अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. टँकरमध्ये तेलसाठा असल्याने परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी घेण्यात येत आहे. अपघातामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला असून महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *