फणस काढण्यासाठी झाडावर चढलेल्या चिपळूण शहरातील ६१ वर्षीय व्यक्तीचा पाय घसरून खाली पडल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल शिवरामराव चव्हाण (वय ६१, रा. समती निवास, बारुमतळी, चिपळूण) हे २१ जून २०२६ रोजी सकाळी आपल्या घरासमोरील फणसाच्या झाडावर फणस काढण्यासाठी चढले होते. यावेळी त्यांचा पाय घसरल्याने ते खाली पडले. या अपघातात त्यांच्या पायाला व कमरेला गंभीर दुखापत झाली.
जखमी झाल्यानंतर त्यांना प्रथम वालावलकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी पुणे जिल्ह्यातील वानवडी येथील कमांड हॉस्पिटलमध्ये हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांना तेथे दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची चिपळूण पोलीस ठाण्यात बीएनएसएस कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यू (आ.मृ. क्र. ४०/२०२६) म्हणून ८ जुलै २०२६ रोजी दुपारी ४.३५ वाजता नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













