Breaking News
राजापूर अल्पवयीन अत्याचार प्रकरणात मोठी कारवाई, व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी आणखी चौघांवर गुन्हा, लॉजच्या मालकाविरोधातही गुन्हा दाखल संगमेश्वर : कोंबड्यांच्या खोलीचा दरवाजा उघडताच बिबट्याची महिलेवर झेप, मीना सुवरे यांच्या चेहऱ्याला नख लागल्याने दुखापत, वनविभागाच्या उपाययोजनांकडे ग्रामस्थांचे लक्ष संगमेश्वर : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महिलांचा पुढाकार! संगमेश्वरच्या भुवडवाडीत श्रमदानातून उभारला बंधारा चिपळूण : भाजपच्या ग्रामीण तालुकाध्यक्षांचा राजीनामा, उदय घाग यांनी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्याकडे सोपविले राजीनामापत्र चिपळूण : नायशीत ‘मिशन बंधारे’; विद्यार्थी अन् ग्रामस्थांचे जलसंधारणासाठी श्रमदान, ग्रामपंचायतीच्या सहकार्याने कच्चा बंधारा उभारला; ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा प्रभावी संदेश

चिपळूण : भाजपच्या ग्रामीण तालुकाध्यक्षांचा राजीनामा, उदय घाग यांनी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्याकडे सोपविले राजीनामापत्र

banner 468x60

चिपळूण भाजपच्या ग्रामीण तालुकाध्यक्षपदाचा उदय घाग यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील पक्ष नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्याकडे राजीनामापत्र सुपूर्द केले. त्यांच्या राजीनाम्याबाबत जिल्हाध्यक्ष काय निर्णय घेतात, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

उदय घाग यांनी राजीनामापत्रात पक्ष संघटनेत काम करताना आपल्या पदाची आणि जबाबदारीची अपेक्षित दखल घेतली जात नसल्याची खंत व्यक्त केली आहे. पक्षाच्या संघटनात्मक कामासाठी प्रामाणिकपणे वेळ देऊन कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करण्याचा सातत्याने प्रयत्न केला. मात्र, काही निर्णयप्रक्रिया आणि संघटनात्मक बाबींमध्ये स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मतांना अपेक्षित महत्त्व मिळत नसल्याने नाराजी निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

पक्षाच्या हितासाठी अनेकदा परिस्थितीशी जुळवून घेत काम केले. मात्र, सध्याच्या परिस्थितीत तालुकाध्यक्ष म्हणून जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडणे योग्य वाटत नसल्याने पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे घाग यांनी स्पष्ट केले आहे. हा निर्णय कोणत्याही वैयक्तिक स्वार्थातून घेतलेला नसून, पक्ष संघटनेतील सध्याच्या परिस्थितीबद्दलची नाराजी आणि मनातील खंत व्यक्त करण्यासाठी घेतल्याचेही त्यांनी राजीनामापत्रात म्हटले आहे.

पक्षाने आजपर्यंत दाखविलेला विश्वास तसेच वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले आहेत. आपला राजीनामा स्वीकारून पदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

दरम्यान, उदय घाग यांच्या राजीनाम्यामुळे चिपळूण भाजपच्या ग्रामीण संघटनेतील घडामोडींची चर्चा सुरू झाली आहे. जिल्हा नेतृत्व या नाराजीची दखल घेऊन राजीनामा स्वीकारणार की घाग यांची समजूत काढून त्यांना पदावर कायम ठेवणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *