चिपळूण : आदित्य ठाकरे आज रत्नागिरी दौऱ्यावर, लोटे औद्योगिक वसाहतीची करणार पाहणी

banner 468x60

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवा सेना प्रमुख तथा आमदार आदित्य ठाकरे बुधवार, २६ ऑगस्ट रोजी लोटे औद्योगिक वसाहतीच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान सायंकाळी ४.३० वाजता ते लोटे औद्योगिक वसाहतीची पाहणी करणार आहेत.

लोटे येथील उद्योग भवन येथे आदित्य ठाकरे उद्योजकांशी संवाद साधणार असून, त्यांच्या अडचणी, प्रलंबित प्रश्न आणि विविध मागण्यांची माहिती जाणून घेणार आहेत. या संवादानंतर उद्योग भवन येथे त्यांची पत्रकार परिषदही आयोजित करण्यात आली आहे.

आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर लोटे औद्योगिक क्षेत्रातील विविध प्रश्न तसेच उद्योजकांना भेडसावणाऱ्या अडचणींवर चर्चा होण्याची शक्यता आहे. यावेळी गुहागर-खेडचे आमदार तथा शिवसेना नेते भास्कर जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव, युवा सेनेचे पदाधिकारी तसेच शिवसेनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *