चिपळूण तालुक्यातील खेड येथील साधना बिल्डर्सच्या धवल व्यापारी संकुलातील कार्यालयातून ७३ लिटर डिझेल चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कंपनीत मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याविरोधात चिपळूण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीस गेलेल्या डिझेलची किंमत ७ हजार २२७ रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते ११.३० वाजण्याच्या दरम्यान खेड येथील साधना बिल्डर्सच्या धवल व्यापारी संकुलातील कार्यालयात घडली.
या प्रकरणी वीरधवल सिताराम घाग (वय ७२, व्यवसाय साधना बिल्डर्स प्रा. लि.चे संचालक, रा. धवल व्यापारी संकुल, खेड, चिपळूण) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, साधना बिल्डर्सच्या नावे एकूण १७३ लिटर डिझेल खरेदी करण्यात आले होते. याच कार्यालयात मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या गोपाळ रामलू डोबाली याने त्यापैकी ७३ लिटर डिझेल फिर्यादींच्या संमतीशिवाय स्वतःच्या फायद्यासाठी चोरून नेल्याचा आरोप आहे. हे डिझेल तीन कॅनमध्ये ठेवण्यात आले होते.
या प्रकरणी १२ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५.१२ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३१८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०६ अंतर्गत कारवाई नोंदवण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास चिपळूण पोलीस करत असून, आरोपीवरील आरोपांची सत्यता तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













