मंडणगड तालुक्यातील धुत्रोली येथे कार्यरत असलेल्या Akshay Construction कंपनीत चोरीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कंपनीच्या क्रेशर विभागातील किरकोळ खर्चासाठी ठेवण्यात आलेली तब्बल ५७ हजार रुपयांची रोख रक्कम ऑफिसमधील टेबलच्या ड्रॉवरमधून चोरीला गेल्याचे समोर आले असून, विशेष म्हणजे ही चोरी कंपनीतीलच एका कर्मचाऱ्याने केल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी मंडणगड Police Station येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
या प्रकरणी कंपनीचे कर्मचारी Sunil Basanna Guttedar (वय २७, रा. धुत्रोली) यांनी मंडणगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीच्या क्रेशर विभागाच्या दैनंदिन खर्चासाठी ५७ हजार रुपये रोख रक्कम ठेवण्यात आली होती. ही रक्कम सुनील गुत्तेदार यांनी ऑफिसमधील क्रेशर विभागाच्या खोलीतील एका टेबलच्या ड्रॉवरमध्ये सुरक्षित ठेवली होती.
शनिवार, १६ मे रोजी रात्री ११ वाजेपासून रविवार, १७ मे २०२६ रोजी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान ऑफिसमध्ये कोणीही नसल्याची संधी साधून आरोपीने ड्रॉवर उघडून त्यातील संपूर्ण रक्कम चोरून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शनिवार, १६ मे रोजी रात्री ११ वाजेपासून रविवार, १७ मे २०२६ रोजी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान ऑफिसमध्ये कोणीही नसल्याची संधी साधून आरोपीने ड्रॉवर उघडून त्यातील संपूर्ण रक्कम चोरून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे.
रविवारी सकाळी ऑफिस उघडल्यानंतर ड्रॉवरमधील पैसे गायब असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर कंपनीत अंतर्गत चौकशी करण्यात आली. या चौकशीत कंपनीतील कर्मचारी Manishkumar Chanchal याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला. पुढील पडताळणीत त्यानेच चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
आरोपी मनिषकुमार चंचल हा सध्या धुत्रोली येथे राहत असून त्याचे मूळ गाव सराय पकवान असल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेनंतर Sunil Basanna Guttedar यांनी १८ मे रोजी मंडणगड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार रात्री ११:२३ वाजता गुन्हा रजिस्टर क्रमांक ५५/२०२६ अंतर्गत नवीन भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३०६ अन्वये चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास Mandangad Police Station चे अधिकारी करत असून चोरीची रक्कम जप्त करण्यासह आरोपीच्या हालचालींचा तपास सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













