Breaking News
रत्नागिरी : अशीही फसवणूक, “तुमचे गॅस बिल अपडेट झालेले नाही. त्यामुळे आजच तुमचे गॅस कनेक्शन बंद केले जाईल,”फसवणुकीचा नवा फंडा, गॅस कनेक्शनच्या नावाखाली मोबाईल हॅक करून खात्यावर डल्ला चिपळूण : डेरवण-राजेवाडी धरण दुरुस्तीला वेग; 14.99 कोटींच्या कामाची आमदार शेखर निकम यांच्याकडून सखोल पाहणी कोकण कन्या एक्सप्रेसमध्ये अवैध मद्यसाठा जप्त; परिचारक रंगेहाथ पकडला गुहागर : टाटा आयरीशचा चुकीचा टर्न आणि तरुणाचा जागीच मृत्यू, अपघातात दुसरा गंभीर जखमी खेड : व्यवस्थापन क्षेत्रात करिअरची संधी MBA / MMS प्रवेशासाठी ATMA 2026 द्वारे सुवर्णसंधी, घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे व्यवस्थापन पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

रत्नागिरी : हातखंब्यानजीक कार-ट्रेलरचा अपघात; कारचालकाचा मृत्यू

banner 468x60

गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर हातखंब्यानजीक रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ कारने अवजड ट्रेलरला मागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला.

banner 728x90

या अपघातात कारचालक ठार झाला. नितीन श्रीकांत शिरवळकर (रा. मुंबई ) असे ठार झालेल्या कार चालकाचे नाव आहे. अपघाताची सविस्तर माहिती अशी शनिवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास रत्नागिरीहून हातखंब्याजवळ ट्रक (जीजे 27 टिएफ 6818) हा गोव्याहून नवी मुंबईकडे चालला होता.

त्याला मागून येत असलेल्या कार ( एमएच 01 एएक्स 9281) ने जोरदार धडक दिली. त्यात कारचालक नितीन श्रीकांत शिरवळकर, रा. मुंबई गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच श्रीक्षेत्र नाणीज येथील जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाची हातखंबा येथील रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली.

त्यातून जखमीला तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरनी त्याला मृत घोषित केले. दोन्ही वाहनांची धडक मोठी होती. त्यात कारच्या दर्शनी भागाचा चेंदामेंदा झाला आहे.

अपघतस्थळी लोकांनी गर्दी केली होती. रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी पंचनामा करून वाहने बाजूला घेतली व वाहतूक पूर्ववत सुरू केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *