लांजा : माचाळ येथे बस कलंडली; ३० ते ३५ प्रवासी सुखरूप, मोठी दुर्घटना टळली

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील माचाळ येथे रविवारी (५ जुलै) सायंकाळी सुमारे ६.३० वाजण्याच्या सुमारास बस (क्र. एमएच ०८ ई ९४१२) कलंडल्याची घटना घडली. बसमध्ये सुमारे ३० ते ३५ प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

घटनेची माहिती मिळताच लांजा पोलीस निरीक्षक निलकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार उर्मिला शिडे, नयना राणे आणि विष्णू मांजरेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिस्थितीची पाहणी करून प्रवाशांना मदत केली तसेच आवश्यक ती कार्यवाही केली.

या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने सर्व प्रवासी सुखरूप बचावले. बस कलंडण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

या घटनेची माहिती महेश पाटील यांनी लांजा पोलीस स्थानकात दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *