BIG BREAKING जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची आज घोषणा होणार, राज्य निवडणूक आयोगाची चार वाजता पत्रकार परिषद Kokan katta news

banner 468x60

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत राज्य निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद आज आयोजित करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद महत्त्वाची मानली जात आहे. १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समिती बाबत घोषणा होणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या वेळापत्रकाबाबत, आरक्षण, निवडणूक प्रक्रिया तसेच आगामी तयारीसंदर्भात माहिती दिली जाण्याची शक्यता आहे. याशिवाय निवडणूक आचारसंहितेबाबतही आयोगाकडून स्पष्ट भूमिका मांडली जाऊ शकते. ही पत्रकार परिषद आज संध्याकाळी ठीक चार वाजता मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे होणार आहे.

राज्यभरातील राजकीय पक्षांचे नेते, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिकांचे लक्ष या पत्रकार परिषदेकडे लागले आहे.
या पत्रकार परिषदेतून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबाबत नेमके कोणते निर्णय जाहीर होतात, याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *