खेड तालुक्यातील फरूस-आमशेत येथे घरफोडीची घटना समोर आली असून, घराच्या छतावरील दोन कौले काढून अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश केला. घरातील गॅस शेगडी, इस्त्री, मिक्सर, स्टीलची भांडी असा एकूण ६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
ही घटना ८ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४ ते ७.४० वाजण्याच्या दरम्यान फरूस-आमशेत येथे घडली. याबाबत ९ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नाझिया अब्दुल गफर परकार (वय ४४, रा. फरूस, आमशेत, ता. खेड) या घरात नसताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या छतावरील दोन कौले काढली. त्यानंतर घरात अनधिकृत प्रवेश करून विविध वस्तू चोरून नेल्या.
चोरीला गेलेल्या वस्तूंमध्ये २ हजार रुपये किमतीची सूर्या क्रिस्टल कंपनीची लाल रंगाची गॅस शेगडी, १ हजार रुपयांची न्यू रॉयल डिलक्स कंपनीची पांढऱ्या रंगाची इस्त्री, १ हजार रुपयांचा समित कंपनीचा पांढऱ्या रंगाचा मिक्सर, १ हजार रुपये किमतीची स्टीलची दोन मिक्सरची भांडी आणि १ हजार रुपये किमतीचे दोन स्टीलचे हांडे यांचा समावेश आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३३१(३), ३३१(४) व ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचे नाव व गाव अद्याप समोर आलेले नसून, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेड पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













