खेडमध्ये ‘आपुलकीचा हात’ उपक्रम उत्साहात संपन्न, ३० गरजू शेतकऱ्यांना जीवनावश्यक वस्तू व आर्थिक मदत

banner 468x60

आपुलकी संस्था, पुणे व खेड तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू शेतकऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला ‘आपुलकीचा हात’ हा सामाजिक उपक्रम आज (मंगळवार, दि. २१ जानेवारी २०२६) रोजी नगर परिषद सभागृह, खेड येथे उत्साहात पार पडला. या उपक्रमांतर्गत तालुक्यातील ३० गरजू शेतकऱ्यांना जीवनावश्यक वस्तू व आर्थिक मदतीचा आधार देण्यात आला.


या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष वैशाली कवळे, शिवचैतन्य पतसंस्थेचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष अरविंद तोडकरी, उत्तमकुमार जैन, रोहन विचारे तसेच खेड तालुका नर्सरी व कृषी विभागाचे प्रमुख कृषी अधिकारी रवींद्र चाळके यांची प्रमुख उपस्थिती होती.

आपुलकी संस्थेच्या वतीने अध्यक्ष मनोज दांडेकर, सचिव राजेंद्र बेलवलकर, खजिनदार मेधा बेलवलकर, अंजली दांडेकर, नामदेव सावंत, संगिता सावंत, समीर मोरे उपस्थित होते.


खेड तालुका पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष राजू चव्हाण, उपाध्यक्ष अश्विनी वडके, सचिव किशोर साळवी, खजिनदार विनय माळी, सदानंद जंगम, श्रीकांत चाळके व सागर पाचरेकर यांनी सहभाग घेतला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत अशा सामाजिक उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित केली. आपुलकी संस्थेमार्फत दिली जाणारी ही मदत शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अनुज जोशी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आपुलकी संस्था, पुणे व खेड तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *