Breaking News
दापोली : स्वयं-सहाय्यता बचत गटांतील महिला होणार उद्योजिका, ‘कृषी संगिनी’ समूहाकडून यशस्वी मार्गदर्शन खेड : लोटे एमआयडीसीत रासायनिक सांडपाणी उघड्यावर सोडल्याचा आरोप, ग्रामस्थ संतप्त, संबंधित कारखान्यावर कठोर कारवाईची मागणी दापोली : शिवाजीनगर-भौंजाळी जिल्हा परिषद शाळेला ‘आदर्श शाळा पुरस्कार’; पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते गौरव दापोली : साखळोली नं. 2 येथे कृषी संगिनींचा पुढाकार; ग्रामस्थांच्या सहभागातून तयार केला गावाचा सर्वसमावेशक नकाशा गुहागर : मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्याकडून जानवळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप, सेवाभावी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

चिपळूण : अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या दोघांवर कारवाई

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील खेर्डी एमआयडीसी येथील स्मशानभूमी परिसरातील जंगलात बेकायदेशीरपणे गांजा सेवन करणाऱ्या दोन तरुणांना चिपळूण पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. शुक्रवारी (३० जानेवारी) सायंकाळी एकापाठोपाठ एक केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये पोलिसांनी ही कारवाई केली.

banner 728x90


खेर्डी एमआयडीसीमधील स्मशानभूमीच्या जंगलमय परिसरात एक तरुण अंमली पदार्थाचे सेवन करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सायंकाळी ४:३० च्या सुमारास पोलिसांनी तिथे छापा टाकला. यावेळी आकाश रामचंद्र चव्हाण (वय २५, रा. विकासवाडी, खेर्डी) हा तरुण गांजा सदृश्य अंमली पदार्थाचे सेवन करताना आढळला.

पोलीस कॉन्स्टेबल रुपेश उल्हास जोगी यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून, आरोपीविरुद्ध गु.र.नं. ३१/२०२६ नुसार एनडीपीएस कायद्याच्या कलम ८ (क) आणि २७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पहिली कारवाई झाल्यानंतर काही वेळातच, म्हणजेच सायंकाळी ४:४५ च्या सुमारास त्याच परिसरात पोलिसांनी दुसरी कारवाई केली. यावेळी रोशन महेंद्र चोगले (वय २५, रा. विकासवाडी, खेर्डी) हा तरुण देखील गांजा सेवन करताना पोलिसांच्या तावडीत सापडला. पोलीस कॉन्स्टेबल शैलेश शांताराम वनगे यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. या आरोपीवर गु.र.नं. ३२/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


खेर्डी एमआयडीसी परिसरातील निर्जन स्थळांचा आणि स्मशानभूमीजवळील झाडीचा वापर तरुण अंमली पदार्थ सेवनासाठी करत असल्याचे या कारवायांमुळे स्पष्ट झाले आहे. चिपळूण पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *