दापोली तालुक्यातील पाजपंढरी येथे क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणात जहूर अलिमिया कोंडविलकर (५३) यांच्या डोक्यात बियरची बाटली मारून दुखापत केल्याची घटना शनिवार ४ जानेवारी रोजी सायं. ७ च्या सुमारास घडली.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार ४ जानेवारी रोजी सायंकाळी जहूर अलिमिया कोंडविलकर यांना त्यांच्या गावात राहणारे राजन कदम यांनी फोन करून तुम्ही गाडीवाल्याचे पैसे देणे बाकी आहात का? अशी विचारणा केली.
जहूर अलिमिया कोंडविलकर हे स्वतः आपल्या मालकीची मोटारसायकल घेऊन पाजपंढरी येथे प्रकाश चौगुले यांच्या घरी विचारणा करण्यासाठी गेले. तेव्हा तेथे असलेला कैसर-पूर्ण नाव माहित नाही. राहणार मुरूड याने कोंडविलकर हे विचारणा करीत असताना मध्येच
त्यांच्याजवळ हुज्जत घालू लागला.
त्यानंतर कोंडविलकर यांच्या अंगावर धावत येऊन झटापटी करून हातात बियरची बाटली घेऊन त्याच्या डोक्यात मारलीः यामध्ये कोंडविलकर यांना दुखापत झाली. तसेच बाटली फुटून त्या बाटलीची काच त्यांच्या उजव्या पायालाही लागून दुखापत झाली.
जहूर कोंडविलकर यांनी कैसर याच्याविरोधात दापोली पोलीस ठाणेत फिर्याद दाखल केली. त्या फिर्यादीनुसार कैसर याच्यावर भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम ११८ (१), १३१ ३५२, ३५१(२) (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*