रत्नागिरी : खारेपाटण येथील अपघातात राजापूरातील दोन तरूणांचा मृत्यू

banner 468x60

खारेपाटण येथे महामार्गावर दुचाकी आणि कंटेनर यांच्यात झालेल्या धडकेत राजापूर येथील दोघे तरुण जागीच ठार झाले. ही घटना काल रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास मुंबई- गोवा महामार्गावर घडली.

banner 728x90 banner 728x90

सचिन एकनाथ लाड (रा. हसोळ राजापूर, वय ३५) हा युवक जागीच ठार झाला. तर त्याच्या समवेत असलेला तानाजी वामन शेळकर (वय ३०, रा. कोडवशी राजापूर शिखरवाडी) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत कणकवली पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

हासोळ येथील बाईक स्वार आपल्या ताब्यातील हिरो होंडा कंपनीची मोटारसायकल क्र. एम एच ०८ एक्स ४२५२ घेऊन खारेपाटण मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गवर आला असता खारेपाटण बॉक्सवेल ओवर फ्लाय ब्रिजवर चूकीच्या साईडने जात असल्याने कणकवलीच्या दिशेने आलेला व मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर वाहन क्र. एम एच ४६ सी एल ३१५८ यांची समोरासमोर धडक होऊन मोटार सायकलस्वार सचिन लाड जागीच ठार झाला.

तर त्याच्या सोबत असलेला तानाजी शेळकर हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला १०८ वाहनाने पुढील उपचारासाठी खारेपाटण प्रा. आ. केंद्रात त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच खारेपाटण पोलीसांनी अपघातस्थळी तातडीने भेट देऊन अपघाताची माहिती घेतली. सदर अपघाताबाबत अधिक तपास खारेपाटण पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *