दाभोळ जवळील कोळथरे येथे मयूर रमेश राठोड या 19 वर्षीय तरुणाचा दगडावर पडून उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी 3.47 च्या सुमारास घडली.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयूर रमेश राठोड हा मूळचा विजापूर येथील आहे. तो सध्या दापोली-कोळथरे शिव कन्स्ट्रक्शन लेबर कॅम्प येथे कामाला आहे. दुपारी लेबर कॅम्प मध्ये तो जेवणासाठी बसला होता.
तेथून उठत असताना अचानक चक्कर आल्याने तो खाली कोसळला. खाली जांभा दगडांवर पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
त्याला पुढील उपचारासाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत.
,

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















