मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरू असतानाच आज (दि.10) सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास कापसाळ येथे चार वाहनांमध्ये अपघात झाला.
या चारही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, दोघेजण जखमी झाले आहेत. कापसाळ मराठी शाळेजवळ एक बोलेरो पिकअप रस्त्याच्या उजव्या लेनला चिपळूणच्या दिशेने उभी असता भरधाव वेगाने येणारी ईर्टिगा गाडी बोलेरोवर धडकली.
यानंतर बोलेरो पिकअप पलटी झाली. यानंतर मागाहून येणार्या अन्य दोन कारदेखील एकावर एक आदळल्या. यामुळे मोठा अपघात झाला.यामध्ये ईर्टिगा चालक जखमी झाला असून, महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
ईर्टिगा डाव्या बाजूला बॅरिकेटसवर जाऊन धडकली. यामुळे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर मुंबईकडे जाणार्या लेनवर वाहतूक कोंडी झाली होती. तत्काळ पोलिसांनी धाव घेत जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलविले व वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न केला.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















