खेड : महिलांच्या वेशात घरात घुसून रक्कम उकळणाऱ्या चौघांना अटक

banner 468x60

महिलांचा वेश परिधान करत घरात घुसून त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या चार जणांना खेड पोलिसांनी ताब्यात घेतले.

तालुक्यातील खवटी येथे काही ग्रामस्थांकडून 1100 ते 2500 रुपये उकळणाऱ्या चौघांना ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे सोमवारी सायंकाळच्या सुमारास पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

पोलिसांनी ताब्यात घेतलेले पाच संशयित महिलांचे वेश परिधान करत घरोघरी घुसत होते. घरात शिरल्यानंतर दमदाटी करून पैशाची मागणीही करत होते.

पोलीस पाटील मनोहर पांडुरंग दळवी यांना याबाबतची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना शिताफिने पकडले.

त्यांच्याकडे चौकशी केली असता काही लोकांकडून घरी जाऊन 1100 ते 2500 रुपये उकळण्याची कबुली दिली.याबाबत पोलिसांना तातडीने कळवण्यात आले.

पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले. याप्रसंगी पोलीस पाटील मनोहर पाटील, सरपंच मानसी पाटील, पोलीस पाटील अमोल दळवी, ग्रामस्थ गणेश दळवी, गणेश जंगम, भगवान शेलार उपस्थित होते. पोलीस पाटील मनोहर दळवी यांच्या सतर्कतेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *