Breaking News
दापोलीकरांसाठी खुशखबर! ताम्हिणी मार्गे पुण्याला जाण्यासाठी बससेवा सुरूदापोली आगारातून चार फेऱ्या; विद्यार्थी, नोकरदार आणि व्यावसायिकांना मोठा दिलासा कुवेतमधील भारतीय दूतावासात 80 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात, भारतीय समुदायाचा उत्स्फूर्त सहभाग; तिरंग्याला मानवंदना देत देशप्रेमाचा जागर गुहागर : उपचार सुरू असताना 42 वर्षीय व्यक्तीचा डेरवण रुग्णालयात मृत्यू खेड : कायदा-सुव्यवस्था राखणे हाच स्वातंत्र्याचा खरा सन्मान, मंत्री योगेश कदम यांचं संबोधन, खेड तहसील कार्यालयात 80वा स्वातंत्र्यदिन उत्साहात दापोली : कोकण कृषी विद्यापीठाच्याविद्यार्थिनी पंचनदीत ‘मिशन आंबा’! प्रत्यक्ष छाटणी प्रात्यक्षिकातून शेतकऱ्यांना आधुनिक बाग व्यवस्थापनाचे धडे

लांजा : गावठी हातभट्टीचा दारूसाठा जप्त

banner 468x60

विनापरवाना गावठी हातभट्टीच्या दारू विक्री प्रकरणी लांजा पोलिसांनी धाड टाकून १८७५ रुपयांच्या गावठी हातभट्टीच्या दारूसाठ्यासह एकाला ताब्यात घेतले आहे.

banner 728x90

ही कारवाई शनिवारी १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी कुरचुंब येथे करण्यात आली. तालुक्यातील कुरचुंब येथे बेकायदा गावठी हातभट्टीची दारू विक्री होत असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार लांजा पोलिसांनी शनिवारी १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.५५ च्या सुमारास कुरचुंब मानेवाडी ते तापेकरवाडी जाणाऱ्या फाट्यावर दुकानाजवळ धाड टाकली.

यावेळी त्या ठिकाणी संदेश राजेंद्र माने (वय ३५, रा.कुरचुंब मानेवाडी) हा गावठी दारूसह आढळून आला. या कारवाईत पोलिसांनी १८ लिटरची गावठी हातभट्टीची १८७५ रूपयांची दारू जप्त केली. विनापरवाना गावठी हातभट्टीच्या दारूच्या विक्री प्रकरणी लांजा पोलीसांनी संदेश राजेंद्र माने याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *