चिपळूण : पोलिस असल्याचे सांगून वृद्धाचे दोन लाखांचे दागिने केले लंपास

banner 468x60

चिपळूणमध्ये फसवणूकीचा एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. आपण पोलिस असल्याचा बनाव करून चिपळुणात दोन अज्ञातांनी एका वृद्धाचे दोन लाखांचे दागिने लंपास केले आहेत.

यामध्ये चार तोळे वजनाचे ब्रेसलेट, चेन, अंगठी असा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी विजय शांताराम सावंत (६८, रा. मार्कंडी, चिपळूण) यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, ही घटना १७ सप्टेंबर रोजी ६.१५ वा. मार्कंडी येथे घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय सावंत हे आपली दुचाकी घेऊन घरी जात असताना त्यांच्या पाठीमागून दोन अज्ञात व्यक्ती मोटारसायकलने आल्या व आम्ही पोलिस आहोत असे सांगून तुमच्या गाडीची कागदपत्रे आणि लायसन्स त्यांना विचारले.

याचवेळी या भामट्या पोलिसांनी, तुम्ही दागिने अंगावर घालून का फिरता? चिपळुणात चोऱ्या वाढल्या आहेत, असे सांगून सावंत यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेऊन तेथून धूम ठोकली.

यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सावंत यांनी पोलिसांत धाव घेतली. यामध्ये दोन लाख किमतीचे दागिने अज्ञातांनी चोरून नेले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *