लांजा येथे इर्टिगा कार आणि दुचाकी यांच्यामध्ये झालेल्या धडकेत रत्नागिरीतील तिघेजण जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी मुंबई-गोवा महामार्गावर घडली. जयप्रकाश चव्हाण (३७ वर्षे), त्यांची पत्नी सोनाली स्वप्निल चव्हाण (३४ वर्षे) मुलगा श्रुजन स्वप्निल चव्हाण (१२ वर्षे सर्व रत्नागिरी कर्ला) अशी जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत.
चारचाकी चालक राजेंद्र सत्यनारायण शाहू (वय-४३, ओसवाल भोईसर, मुंबई) हा आपल्या ताब्यातील इरटीका (एमएच ४८ सीसी ४४८२) घेऊन मुंबई- गोवा महामार्गावरून लांजा येथील आपल्या मित्राकडे येत होता. मुंबई येथून लांजा येथे येण्यासाठी शुक्रवारी रात्री ११ वाजता निघाला होता.
इर्टिगा गाडी मुंबई-गोवा महामार्गावरील देवधे धनावडे शेती फार्म येथे सकाळी ८.४५ वाजण्याच्या दरम्यान आली असता. समोरून लांजा ते रत्नागिरीच्या दिशेने जाणारी दुचाकी स्प्लेन्डर (एमएच ०८ एजे ०९३४) यांच्यामध्ये समोरासमोर जोरदार धडक बसली.
यावेळी दुचाकी चालक स्वप्नील जयप्रकाश चव्हाण व त्याची पत्नी सोनाली स्वप्निल चव्हाण, मुलगा श्रुजन स्वप्निल चव्हाण हे जखमी झाले. अपघातात दुचाकी चालक स्वप्निल चव्हाण आणि मागे बसलेली त्यांची पत्नी सोनाली चव्हाण व दोन मुले श्रुजन आणि सर्वज्ञ हे महामार्गावर जोरदार आदळले.
त्यामुळे स्वप्नील आणि त्याची पत्नी सोनाली या दोघांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. यांसह १२ वर्षीय श्रुजन याच्या पायाचा अंगठा तुटला आहे.
अपघातानंतर तिघांनाही रुग्णवाहिकेने रत्नागिरी येथे एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल आर.ए. कांबळे हे अधिक तपास करत आहेत.
वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*