नॅशनल हायस्कूल मांदिवली मध्ये शिक्षक दिवस साजरा

banner 468x60

दि यंग पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबई संचलित नॅशनल हायस्कूल मांदिवली मध्ये शिक्षक दिवस उत्साहात साजरा झाला.

मुदब्बीर मुकादम, इसरार मुकादम, मुजमील मुकादम, अनस मुजावर, शहजादी खान, लायबा खान, अली होडेकर यांनी शिक्षकाची भुमिका बजावली.

त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक फैयाज सर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमा झाला. मुस्तकिम मुकादम याने कुराण पठण, तोसीफ मुकादम याने हमद, इरहम फकी हिने नात सादर केली.

दिवसभरातील शिक्षक व इतर विद्यार्थी तील जुबिया दिवेकर, इरम वस्ता, मेहरीन डायली, फहीमा चाऊस, साहीम चाऊस यांनी शिक्षकांच्या महानता याविषयावर भाषणे केली.

फहीमा मॅडम, परकार सर, जमादार सर, रेहान सर यांनी शिक्षक दिवस व शिक्षकांची बदलत्या सामाजिक परिस्थितीत जबाबदारी या विषयावर प्रकाश टाकला.

अध्यक्षीय भाषणात फैयाज सर यांनी दर्जेदार शिक्षणाचे महत्त्व विषद करून शिक्षकांचा आदर तसेच डाॅ राधाकृष्णन यांना आदरांजली वाहिली.कार्यक्रम सूत्रसंचालन जमादार सर यांनी केले.

कार्यक्रम यशस्वीतेबददल संस्था अध्यक्ष उस्मान मालवणकर, उपाध्यक्ष डाॅ.अजीज सावंत, सचिव अ.कादीर खांचे, सहसचिव अस्लम जुवळे, शालेय समिती चेअरमन नूर मोहम्मद मुकादम, व्हाईस चेअरमन इक्बाल मुकादम, सदस्य जमालुददीन मुकादम, गुलाम हुसैन भारदे, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष मेहबूब मुकादम यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *