दापोली : चालत्या एसटी बसमधून अचानक धूर

Screenshot

banner 468x60

चालत्या एसटी बसमधून अचानक धूर आल्याने प्रवाश्यांमध्ये काहीवेळ भीती निर्माण झाली होती. दापोली हर्णै मार्गावर ही घटना घडली आहे.

चालक वाहकाच्या सतर्कतेमुळे प्रवासी सुखरूप असले तरीही मेंटेनन्स योग्य पद्धतीने केला नसल्याने दापोली एसटी डेपोचा अजब कारभार समोर आलाय.

सदर घटना रविवारी दुपारी दीड वाजता पाजपंढरी दापोली एसटी बसमधे घडला. अचानक इंजिन गरम झाल्याने चालत्या गाडीमधून धूर येऊ लागला.

सुदैवाने चालक आणि वाहक यांच्या सतर्कतेमुळे प्रवाशांना उतरून गाडी उभी करण्यात आली. हा प्रकार दापोली शहराजवळ गिम्हवणे येथे घडला . यावेळी एसटी बसमध्ये दहा ते बारा प्रवासी होते दरम्यान त्यांना सुखरूप उतरवण्यात आलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *