रत्नागिरीमधून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे, प्रवाशांनी भरलेल्या दोन बस कंटेनरवर धडकल्या खेडमधील कशेडी बोगद्यात हा अपघात झाला आहे.
गणेशोत्सव असल्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची बसमध्ये गर्दी आहे, दोन्ही बस प्रवाशांनी फुल भरलेल्या होत्या. या दोन्ही बसमधून अंदाज 80 प्रवासी प्रवास करत होते.
कशेडी बोगद्यात बाईकला वाचवण्यासाठी कंटेनरने अचानक ब्रेक मारला, त्यामुळे प्रवाशांनी भरलेलेल्या दोन बस एकमेकांवर आदळल्या. सुदैवान या अपघातामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाहीये, सर्व 80 प्रवासी सुखरूप आहेत.
मात्र बसचं यामध्ये मोठं नुकसानं झालं आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले, अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसमधून रवाना करण्यात आलं आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















