खेड :एम.आय.बी गर्ल्स हायस्कूल एण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा संपन्न

banner 468x60

खेड-शहरातील बज्म-ए-इमदादीयाच्या एम.आय.बी गर्ल्स हायस्कूल एण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये गुरुवार दि.8 ऑगस्ट 2024 रोजी

दुपारी 12:00 वाजता मुख्याध्यापक शहाबुद्दीन परकार सरांच्या अध्यक्षतेखाली व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

त्यासाठी मा.तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून असरार अहमद परकार सर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात कुरआन पठणाने करण्यात आली.

यानंतर पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. असरार अहमद सरांनी सर्व विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना जीवनात यशस्वी होण्यासाठी करिअर कसे निवडावे व यशाचे शिखर कसे गाठावे याचा कानमंत्र दिला.

त्यादरम्यान त्यांनी अनेक शंकांचे निरसनही करताना विद्यार्थिनींच्या भविष्यकालीन प्रगतीसाठी शुभेच्छाही दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *