खेड : धरणात वाहून गेलेल्या जयेश आंब्रेचा अखेर मृतदेह सापडला

banner 468x60

खेड तालुक्यातील शेल्डी धरणाच्या प्रवाहातून एक 32 वर्षीय तरुण रविवारी दुपारी वाहून गेला होता त्याची शोध मोहीम सुरू होती अखेर तरुणाचा मृतदेह सोमवारी अथक प्रयत्ना नंतर दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास धरणाच्या खालच्या बाजुला एका झुडूपामध्ये आढळून आला आहे.

रविवारी मुसळधार पावसात शेल्डी धरणाच्या पाण्याच्या प्रवाहात हा तरुण वाहून गेला होता त्याचा रविवारी शोध घेण्यात आला मात्र मृतदेह आढळून आला नव्हता सोमवारी पुन्हा शोध कार्य हाती घेत घेण्यात आलेल्या शोधात त्याचा मृतदेह आढळून आला.

खेड तालुक्यातील शेल्डी धरणाच्या प्रवाहातून एक 32 वर्षीय तरुण जयेश रामचंद्र आंब्रे वाहून गेल्याची घटना घडली होती. धक्कादायक म्हणजे तिघांच्या डोळ्यांदेखत हा तरुण वाहत चालला होता.

मात्र, प्राण्याच्या प्रवाहासमोर त्यांचं काही चाललं नाही. या घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *