राज्यात सर्वत्र पावसाचा जोर सुरु आहे. दापोली तालुक्यातही मुसळधार पाऊस सुरु आहे. आज सकाळ पासून पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे.
दापोली तालुक्यातील ताडील-कोंगळे रस्त्यावर दरड कोसळली आहे . दरड कोसळल्यामुळे या ठिकाणची वाहतुक बंद आहे अशी माहिती मिळत आहे.
तालुका प्रशासनातर्फे जेसीबीच्या सहाय्याने दरड हटवण्याचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. हवामान विभागाचा आज रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. सोमवारी सुद्धा हवामान खात्याचा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी दिली आहे. मुंबईत रविवारी मध्यरात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे.
अनेक सखल भागात पाणी देखील साचले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच नद्या अद्यापही धोक्याच्या पातळीवर आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील काजळी, अर्जुना, कोदावली, शास्त्री, मुचकुंदी नदी इशारा पातळीवर आली आहे. चांदेराई बाजारपेठेतील पाणी ओसरले आहे.
वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*