दापोली : मित्रांच्या डोळ्यांदेखत मुलगा खेम धरणात बुडाला, मुसळधार पाऊस, अंधारामुळे शोधकार्य थांबलं

Screenshot

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. सर्व धरण तुडुंब भरली आहेत. हर्णैमधील खेम धरणात चार मुले पोहायला गेली होती.

दापोली तालुक्यातील सातांबा गावातील ही चार मुले आहेत. दापोली येथे जात असताना घरी न येता हे चारजण हर्णैयेथील खेम येथील धरणावर गेले होते.

आंघोळ करण्यासाठी धरणात उतरले असता यामध्ये कल्पेश बटावळे हा 19 वर्षाचा मुलगा पाण्यात बुडाला असून इतर मुले सुखरूप आहेत.

तात्काळ पोलिस यंत्रणा उपस्थित राहून शोधकार्य करण्यात आलं मात्र अंधार असल्यामुळे आणि मुसळधार पाऊस , पाणी खोल असल्यामुळे शोधकार्य सकाळी करण्यात येणार असल्याची माहिती दापोलीच्या तहसीलदार अर्चना बोंबे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *