रत्नागिरी : दाभोळे घाटात दरड कोसळली

Screenshot

banner 468x60

रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील दाभोळे घाटात दरड कोसळल्याने दोन्ही बाजूची वाहतूक थांबली होती.संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे घाटात महामार्गावर ही दरड कोसळली. दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.

आता वाहतूक सुरु आहे. महामार्गावरील रस्ता रुंदीकरणाच्या कामातील यंत्रसामग्रीने दरड बाजूला करण्यात आली आहे. दुपारी १ ते २ च्या दरम्यान दरड कोसळल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती.

मिऱ्या-नागपूर महामार्गावरील दाभोळे येथील घाटामध्ये दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे वाहन चालकासह प्रवासी त्रस्त झाले. मात्र रस्त्यावर आलेला भराव उचलण्याचे काम युद्ध पातळीवर करून अखेर मार्ग सुरु करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *