Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

चिपळूण : ग्रॅव्हिटी पाणी योजनेला 160 कोटी

banner 468x60

गेल्या काही वर्षापासून रखडलेल्या चिपळूण शहराच्या ग्रॅव्हिटी पाणी योजनेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. शहराला कोळकेवाडी धरणातून ग्रॅव्हिटीने करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेसाठी १६० कोटींच्या खर्चाला तांत्रिक मंजुरी मिळवण्यात यश मिळाले.

ग्रॅव्हिटी योजनेस तांत्रिक मान्यता मिळाल्याने पाणी योजनेचा मार्ग सुकर झाला असून, भविष्यात शहरातील मचूळ पाण्याचा प्रश्न निकालात निघण्यास मदत होणार आहे.

चिपळूणच्या ग्रॅव्हिटी पाणी योजनेसाठी आमदार शेखर निकम, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, पालकमंत्री उदय सामंत, नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, माजी नगरसेवक विजय चितळे आदींनी सातत्याने पाठपुरावा केला. शहरातील ग्रॅव्हिटी पाणी योजनेचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून रखडला होता. मंगळवारी सायंकाळी शासनातर्फे १६० कोटी खर्चाच्या या योजनेस तांत्रिक मान्यता देण्यात आली.

सद्यःस्थितीत शहरास गोवळकोट व खेर्डी येथून वाशिष्ठी नदीतील पाणी उचलून ते शहराला पुरवले जाते; मात्र अनेकदा खाडीचे पाणी वाशिष्ठी नदीत मिसळत असल्याने गोवळकोट येथून होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेतून मचूळ पाणीपुरवठा होते. त्यामुळे गांधारेश्वर येथे जॅकवेल उभारून तेथून पाणी उचलून ते शहराला पुरवण्याची मागणी केली जात होती.

त्यासाठी काही लाखांचा निधीही मजूर करण्यात आला होता. वीजबिलोपोटीदेखील दर महिना पालिकेला लाखो रुपये मोजावे लागतात. त्यासाठी कोळकेवाडी धरणातून ग्रॅव्हिटी पाणी योजनेसाठी गेल्या १० ते १५ वर्षापासून प्रयत्न सुरू होते. ग्रॅव्हिटी पाणी योजनेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

कोळकेवाडी धरणातून थेट चिपळूण शहरास पाणीपुरवठा केला जाणार असल्याने शुद्ध व मुबलक पाणी शहरवासियांना मिळण्यास मदत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *