Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

खेड : जगबुडी नदी इशारा पातळी स्थिरावली

banner 468x60

खेड तालुक्यात गेल्या २४ तासांत सरासरी ७१.२८ मिमीएवढा पाऊस झाला असून एकूण ७११. १८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

तालुक्यात सर्वाधिक पाऊस लवेल मंडळात १०६ मिमी, तर आंबवली मंडळामध्ये सर्वांत कमी २४ मिमी पाऊस गेल्या चोवीस तासांत झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस समाधानकारक असल्यामुळे शेतकरीवर्गात उत्साह आहे.

जगबुडी नदी इशारा पातळीवरून वाहत आहे. बुधवारी (ता. २६) रात्री १० वा. जगबुडीने यावर्षीची सर्वोच्च पातळो ५.७० मीटर गाठली होती; मात्र त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पाणीपातळीत घट झाली असून, आज सकाळी १० वाजेपर्यंत ५. १० मीटरएवढी स्थिरावली होती.


त्यानंतर संध्याकाळी ५ मीटर झाली. जगबुडी आणि नारंगी या दोन्ही नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असली तरी इशारा पातळीवर स्थिरावल्यामुळे व्यापाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

आठ दिवस सुरू असलेल्या पावसात नांदीवली विठ्ठलवाडी येथील विजय जनार्दन चव्हाण यांच्या घराचे छप्पर कोसळून अंदाजे २ लाख रुपयांचे नुकसान झाले.

तालुक्यातील भरणे मंडळ ८१ मि.मी., कुळवंडी मंडळ ८१ मि.मी., खेड ७६ मि.मी. तर शिशी मंडळ ६३ मि.मी. पावसाची नोंद आज सकाळी ६ वाजेपर्यंत झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *