राजापुर : 28 वर्षीय विवाहीत महिला बेपत्ता

banner 468x60

रत्नागिरी येथील राजापुरमधील स्वरा सचिन धुरी, वय वर्षे 28, या 2 जून रोजी बंगलवाडी, राजापूर येथून सकाळी 11 वा. पासून बेपत्ता झाली आहे.

तिची उंची 4.5 फूट, अंगाने मध्यम, रंग गोरा, केस काळे लांब, डोळे काळे, नाकात सोन्याची पुल्ली, कानात सोन्याची कुडी, गळ्यात सोन्याची चेन व एकेरी सराचे मंगळसुत्र, हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या त्यामध्ये बेन्टेक्सच्या पिवळसर बांगड्या,

पायत पैंजण, अंगात लालसर गुलाबी रंगाची साडी व ब्लाऊज, पायात लालसर रंगाची सँडल, हातात गुलाबी रंगाची पर्स आहे. या महिलेबाबत कोणतीही माहिती मिळाली

अथवा त्या कुठेही दिसल्यास पोलीस निरीक्षक, राजापूर पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *