कोकण कट्टा न्यूजच्या सर्व वाचक आणि प्रेषकांचे अभिनंदन, कोकण कट्टा लाईव्हचा परिवार झाला 10 हजारांचा

कोकण कट्टा न्यूजच्या सर्व वाचक आणि प्रेषकांचे अभिनंदन, कोकण कट्टा लाईव्हचा परिवार झाला 10 हजारांचा

banner 468x60

अवघ्या चार महिन्यात कोकण कट्टाने 10 हजार सबस्क्राईबचा टप्पा पूर्ण केलाय. कोकण कट्टाचा प्रवास सुरुवातीला वेबसाईट आणि त्यांनतर यूट्यूब चॅनल आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यातून सुरु झाला.

Subscribe : kokan katta live news

https://youtube.com/@kokankattalive312?si=mG1g811Jsn06WNqX


या सहकार्याबद्दल कोकण कट्टाचे प्रेषक आणि वाचनकांचा मोलाचा वाटा आहे. आपण दिलेला विश्वास आम्ही बातम्यांच्या माध्यमातून सार्थकी लावू .

कोकणातील अनेक स्थानिक प्रश्न आणि जनतेला न्याय देणारं व्यासपीठ म्हणून कोकण कट्टाची ओळख आहे. आमची टॅगलाईनच आहे वेगवान बातमी अचूक आणि थेट भूमिका. आम्ह्याला सांगायला आनंद होतो की आम्ही केलेल्या अनेक बातम्यांचा इम्पॅक्ट झाला आहे.

आम्ही नेहमी सामाजिक भूमिका घेऊन ही पत्रकारिता सुरू केलीय. आम्ही सामाजिक बातम्या आणि जनहिताच्या बातम्या आणि सामन्यांना न्याय देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करत आहोत . जनहिताच्या बातम्यांना आम्ही प्राधन्य देतो . समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत जाऊन कोकण कट्टा न्युज एक आवाज बनला आहे.

आम्ही निप: क्षपणे कोणालाही न घाबरता जी सत्याची भूमिका आहे ती मांडतो. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ही एक छोटी सुरुवात आहे. सत्याला धरुन आमची पत्रकारिता आहे. या प्रवासात आमचे सहकारी पत्रकार जाहीद मुजावर जे पूर्णपणे कोकण सांभाळतात रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग याची जबाबदारी ते पार पाडत आहेत.

त्यांच्यासोबत पत्रकार योगेश तेलगडे, कोकण उपविभागाचं म्हणून काम पाहत आहेत. कोकण कट्टाचे सल्लागार प्रसिद्ध वृत्तनिवेधक, वरिष्ठ पत्रकार ऋषी देसाई यांचा मोलाचा वाटा आहे. पत्रकार राजस मूरकर हे देखील दाभोळ, दापोली याठिकानची जबाबदारी सांभाळतात.

मी स्वतः हे माध्यम तळागाळातील लोकांना न्याय देण्यासाठी आणि त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी केला आहे. राजकीय हस्तक्षेपाला जुगारुन आम्ही आमची भूमिका मांडतो आणि यापुढेही मांडत राहू.

हा परिवार अजूनही खूप पुढे न्यायचा आहे. ही एक छोटीशी सुरुवात असून त्याचा हा टप्पा आपण पूर्ण केलाय. अर्थातच तुमच्या सहकार्यामुळे आपण देखील कोकण कट्टाचे सहकारी आहात. तुम्ही जोडलात म्हणून हा परिवार मोठा झालाय. यामुळे आमची जबाबदारी वाढलीय,

आपलं प्रेम आणि विश्वास नेहमी कायम ठेऊ आणि नेहमी एक चांगली पत्रकारिता घेऊन आपल्यासमोर येऊ. धन्यवाद पुन्हा आपल्या सहकार्याबद्दल आणि प्रेमाबद्दल


संपादक – तेजस बोरघरे, कोकण कट्टा लाईव्ह, ©️ 2024 Kokan Katta Live | Media Network
Rg | No | MH | 28-0047569
Ratnagiri | Dapoli
वेगवान बातमी | अचूक आणि थेट भूमिका |

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *