रत्नागिरी : मैत्रिणीने केली मैत्रिणीच्या घरी चोरी, सहा महिन्यांपूर्वीच प्लानिंग

banner 468x60

शहरातील हयातनगर येथील सदनिकेतून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 82 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवणाऱ्या शेजारील संशयित महिलेला शहर पोलिसांनी अटक केली.

तिने या चोरीसाठी बनावट चावी सहा महिन्यांपूर्वीच तयार करून घेतली होती. रुहीन हकीम (37, रा.हयातनगर,रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयित महिलेचे नाव आहे. याबाबत सफुरा जाविद डांगे (43, रा. हयातनगर, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

त्यानूसार, त्या कुटुंबियांसोबत बाहेरगावी गेल्या होत्या. शनिवारी सकाळी त्या परतल्या असता त्यांना आपल्या सदनिकेचे पुढील लाकडी दरवाजाचे कुलुप गायब झालेले दिसून आले.

त्यांनी आतमध्ये जाउन पाहिले असता त्यांना बेडरुमधील बेडमध्ये ठेवलेल्या ज्वेलरी बॉक्स मधील सोन्याची बांगडी, सोन्याचे कानातील जोड, सोन्याच्या दोन अंगठया आणि रोख 9 हजार रुपये असा एकूण 82 हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे लक्षात आले. याप्रकरणी त्यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर शहर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

तेव्हा सफुरा डांगे यांनी आपली शेजारी रुहीन हकीम हिने 6 महिन्यांपूर्वी माझ्याकडून आपले घर बंद करण्यासाठी कुलुप नेल्याची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांनाही तिची हालचाल संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी तिला ताब्यात घेउन चौकशी केली असता तिने 6 महिन्यांपूर्वी कुलुपाची बनावट चावी बनवून घेतल्याची माहिती दिली. दरम्यान 6 महिन्यांनंतर डांगे कुटुंबिय बाहेर गावी गेल्याची संधी साधत तिने त्या चाविचा उपयोग करुन ही चोरी केल्याचे उघड झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *