Breaking News
रत्नागिरी : कुवारबाव येथे तीन डंपरची धडक, ब्रेक फेल झाल्याने अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली मंडणगड : आंबेत पुलाला बार्जची धडक होऊन महिना उलटला, अवजड वाहतूक अद्याप बंदच, स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण झाल्याची माहिती, तरी निर्णय रखडला; प्रवासी, वाहनधारक आणि व्यापाऱ्यांचा प्रशासनाला सवाल रत्नागिरी : विद्यार्थ्यांच्या सुरक्षित आणि उज्ज्वल भविष्यासाठी रत्नागिरी पोलिसांचे कौतुकास्पद पाऊल‘मिशन रायझिंग फ्लॉवर्स’अंतर्गत महिला सुरक्षा समिती व भरोसा सेलची संयुक्त बैठक दापोली : ई-शिवाई बस कर्मचाऱ्याला धमकी दिल्या प्रकरणी शिवसेना शहरप्रमुख प्रसाद रेळेकर यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल, तक्रार दाभोळ पोलिसांकडे वर्ग दाभोळ : खाडीतील मत्स्यव्यवसायाच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना कराप्रदूषित सांडपाण्यामुळे मासेमारीचे नुकसान, मंत्री नितेश राणे यांचे यंत्रणांना निर्देश

चिपळुण : इमारतीवरून पडून दोघांचा मृत्यू

banner 468x60

खेर्डी शिवाजीनगर येथे एका इमारतीच्या प्लास्टरचे काम करताना दुसऱ्या मजल्यावरून पडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी 1.30 वाजता घडली.

banner 728x90

यामध्ये खेर्डी शिगणवाडी येथील तरुणासह एका मजूर महिलेचा समावेश आहे.सुरेश मारुती शिगवण (36 खेर्डी शिगवणवाडी) व पूनम दिलीप सहा (40 खेर्डी शिवाजीनगर, मूळची बिहार) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. खेर्डी शिवाजीनगर येथे एका इमारतीच्या प्लास्टरचे काम सुरु होते.

त्यासाठी दुसऱ्या माजल्यापर्यंत लाकडी पलांजा बांधण्यात आला होता. त्यातील एक बांबू तुटल्याने त्यावर उभे असलेले दोघेजण दुसऱ्या माजल्यावरून खाली कोसळले. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे त्यांना मृत घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरेश मारुती शिगवण याच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. तसेच त्यांची पत्नी गीता शिगवण हिचे वर्षभरापूर्वीच निधन झाले. त्यामुळे त्यांची मुले पोरकी झाली. तसेच पूनम दिलीप सहा यांना चार मुलं असून त्यांचेही मातृत्व हरपले. या घटनेची पोलीस स्थानकात नोंद करण्याचे काम उशिरा पर्यंत सुरु होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *