Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

चिपळूण : वीजबील भरण्यावरून चार भावांची हाणामारी

banner 468x60

विजबिल भरण्यावरून भावाभावात हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी रात्री ९.१५ वाजता कुंभार्ली घागवाडी येथे घडली. यात एकजण जखमी झाला असून तिघांवर अलोरे शिरगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समीर रघुनाथ जाधव (३०) असे जखमीचे तर संकेत रघुनाथ जाधव, सूरज रघुनाथ जाधव, सौरभ रघुनाथ जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हा दाखल झालेले तिघेजण मूळ घरात राहत असून समीर हा मूळ घराच्या शेजारी बांधलेल्या नवीन घरात राहतो.

त्याने या घरात नवीन वीज कनेक्शन न घेता मूळ घरातून वीज घेतली आहे.


त्याचे वीजबील भरण्यावरुन त्यांच्यात वाद आहेत. मंगळवारी रात्री ९.१५ वाजता यावरूनच वाद झाला असता तिघांनी समीर याला मारहाण केली.

त्यात तो जखमी झाल्याने त्याने दिलेल्या तक्रारीवरून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *