तालुक्यात पावसाने हजेरी लावली असली तरीही पाणीटंचाईचे सावट कायम आहे. कळंबणी बुद्रुक- दंडवाडी, तिसंगी-धनगरवाडी, सवेणी-धनगरवाडी आदी ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाल्यामुळे ग्रामस्थांनी प्रशासनाकडे धाव घेतली होती.
अखेर तिन्ही गावातील वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरवात झाल्यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला. तालुक्यात १७ गावे ४४ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दोन टँकरच्या साह्याने पाणीपुरवठा करताना प्रशासन मेटाकुटीस आले आहे.
अपुऱ्या टैंकर अभावी ग्रामस्थांनाही टँकरच्या पाण्याची प्रतीक्षा करावी लागत असल्याने ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. पाणीटंचाई रौद्ररूप धारण करत असल्यामुळे ग्रामस्थ रडकुंडीस आले आहेत.
पाणीटंचाईग्रस्त गावांत आणखी तीन गावातील तीन वाड्यांची भर पडली असून प्रशासनाकडून याठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करून ग्रामस्थांची तहान भागवली जात आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















