रत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी पुढील 2 ते 3 तास महत्वाचे, मुसळधार पावसाचा इशारा

banner 468x60

राज्यातील बहुंताश भागात पाऊस (Rain) हजेरी लावत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. काही भागात मुसळधार पाऊस झाल्यामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत.

तसेच धरणांच्या पाणीसाठ्यात देखील वाढ होत आहे. दरम्यान, आजही राज्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. दरम्यान, पुढील 2 ते 3 तास रत्नागिरी (Ratnagiri) आणि सिंधुदुर्ग (Sindhudurg)जिल्ह्यासाठी महत्वाचे आहेत.

कारण पुढील 2 ते 3 तासात या दोन्ही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशार हवामान विभागानं दिला आहे. हवामान विभागानं रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळं पुढील दोन ते तीन तास या दोन्ही जिल्ह्यासाठी महत्वाचे आहेत.

तसेच गोव्यात देखील मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागामं दिला आहे. त्याचबरोबर कर्नाटक आणि उत्तर केरळ किनारपट्टीवर पुढील 3 ते 4 तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *