महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या http://mahresult.nic.in या वेबसाईटला भेट द्या.
होमपेजवरील दहावीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा. तुमच्या लॉगीन डिटेल्स, परीक्षा क्रमांक, आईचं नोंदवा. स्क्रीनवर तुमचा निकाल उपलब्ध होईपर्यंत थांबा.
थोड्या वेळात तुमचं निकाल जाहीर होईल, निकाल मिळाल्यावर पीडीएफ फॉरमॅटमध्ये डाऊनलोड करा किंवा अथवा त्याची छापील प्रत काढून घ्या. विद्यार्थ्यांना निकाल लागल्यावर मूळ छापील प्रत ही काही दिवसांनतर त्यांच्या शाळांमध्ये दिली जाणार आहे.
मार्च २०२४ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १०¤ वी) परीक्षा मार्च २०२४ चा निकाल आज सोमवार दि. २७ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन पध्दतीने जाहीर करण्यात येणार असल्याचे विभागीय सचिव, कोकण विभागीय मंडळ यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळावर सोमवार, दि. २७ मे २०२४ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. असा पाहा निकाल

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















