रत्नागिरी : मतदानासाठी मंगळवारी भर पगारी रजा

banner 468x60

7 मे रोजी प्रत्येक मतदाराला मतदान करता यावे यासाठी लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 चे कलम 135 ब नुसार भरपगारी रजा देय असल्याचे आदेश जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले आहेत.

आदेशात म्हटले आहे की, रत्नागिरी जिल्हा हा 32 रायगड व 46 रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात विभागला गेला आहे व दोन्ही मतदार संघात तिस-या टप्प्यात मंगळवार दि.7 मे रोजी मतदान होणार आहे.

या मतदार संघांच्या मतदारयादीत समाविष्ट असलेल्या प्रत्येक मतदाराला मतदान करता यावे, यासाठी सर्व मतदारांना लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 चे कलम 135 ब नुसार भरपगारी रजा देय आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व आस्थापनाप्रमुखांना त्यांच्या अधिपत्या खालील सर्व अधिकारी, कर्मचारी, रोजंदारी कर्मचारी यांना मंगळवार दि.7 मे रोजी भरपगारी रजा मंजूर करण्याचे आदेश पुढील शर्ती, अटीस अधिन राहून देय आहे.

हा आदेश शासकीय आस्थापना, खासगी आस्थापना, रोजंदारीवरील कर्मचारी आस्थापना, दुकाने, कंपनी अशा सर्व आस्थापनांना लागू आहे.

ज्या आस्थापनांमध्ये या कामगारांच्या अनुपस्थितीमुळे उक्त आस्थापनांचा धोका निर्माण होऊ शकतो अथवा मोठ्या प्रमाणात तोटा होऊ शकतो अशा कर्मचा-यांसाठी लागू नाही. या आदेशाचे पालन न करणारे आस्थापनाप्रमुख हे उक्त कलमाचे 135 ब (2) नुसार कारवाईस पात्र राहतील.

हा आदेश अन्य जिल्ह्यात काम करणा-या परंतु रत्नागिरी जिल्ह्याच्या क्षेत्रातील मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांच्या आस्थापना प्रमुखांनाही लागू होत आहे, असेही आदेशात म्हटले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *