खेड : डंपर खाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू, खेडमध्ये अपघातांचे प्रमाण वाढले

banner 468x60

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खेड तालुक्यातील रेल्वे स्टेशन जवळ खोपी फाट्याजवळ शुक्रवारी सायंकाळी ३ वाजण्याच्या सुमारास सांगलीतील औषध कंपनीचा प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या तरुणाचा डंपर खाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना घडली.

banner 728x90

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर तालुक्यातील खोपी फाटा येथे शुक्रवारी सायंकाळी ३ वाजता दुचाकी ( एम एच ०८बी ५९०१) वरून खेडहुन चिपळूणच्या दिशेने जाणारा रत्नागिरी येथील औषध कंपनीचा प्रतिनिधी अरुण जयस्वाल

(रा.रत्नागिरी) याच्या दुचाकीला डंपरची (एमएच ०८ बीबी ८९०१) धडक झाली. यावेळी डंपर च्या चाकाखाली सापडून जयस्वाल चिरडला.

गंभीर जखमी होऊन त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या प्रकरणी अधिक तपास खेड पोलीस करीत आहेत.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *