चिपळूण : पत्नीवर सुऱ्याने वार करत गंभीर जखमी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल

banner 468x60

पतीने पत्नीवर सुऱ्याने वार करत गंभीर जखमी केल्याची घटना काही दिवसांपूर्वी तालुक्यातील मार्गताम्हाने येथे घडली होती.

या प्रकरणी त्या वार करणाऱ्या पतीवर चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. गणेश शिवराम माने (रा. आंबडस) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे.
याबाबतची फिर्याद पत्नी जयश्री गणेश माने (36, मार्गताम्हाने) यांनी दिली.

शिमगोत्सव असल्याने जयश्री माने या आई पद्मावती देवी मंदिरात ओटी भरण्यासाठी आल्या होत्या. त्या दुकानात ओटी आणण्यासाठी आल्या असता मंदिराच्या पुढे रस्त्यावर त्यांचा पती गणेश माने आला व त्याने ‘मला तुझ्याशी बोलायचे आहे’ असे म्हणून जयश्री यांना थांबवले.

यावेळी गणेश याने अचानक जयश्री यांचे केस पकडून त्याच्या हातात असलेल्या सूऱ्याने त्यांच्या दोन्ही हातावर खोलवर वार केला.

यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. याप्रकरणी जयश्री माने यांनी चिपळूण पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार पती गणेश माने याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *