दापोली : पितांबरी अॅग्रो टूरिजम तर्फे बॅडमिंटन स्पर्धेचं आयोजन

banner 468x60

दापोलीतील नामांकित बॅडमिंटन ग्रुप फ्युचर बॅडमिंटन ग्रुप तर्फे सालाबादाप्रमाणे यावर्षी दापोली विधानसभा क्षेत्र मर्यादित ओपन डबल्स आणि लकी डबल्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

banner 728x90 banner 728x90

याआधी फ्युचर बॅडमिंटन ग्रुप ने 2018, 2019, 2020 या साली बॅडमिंटन स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले होते. यावर्षी पुन्हा नव्या जोमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

दापोली विधानसभा क्षेत्रातील बॅडमिंटनपटूंना हक्काचं व्यासपीठ या निमित्ताने प्राप्त झाले आहे. ही स्पर्धा दिनांक 19, 20, 21 एप्रिल 2024 रोजी आझाद मैदान येथील दापोली तालुका बॅडमिंटन असोसिएशन हॉल येथे होणार आहे.

विशेष म्हणजे स्पर्धेत वयोमर्यादा कोणतीही नाही. प्रथम येणार्‍या जोडीस रु. 3000 व आकर्षक चषक तर द्वितीय क्रमांकास रु. 2000 व आकर्षक चषक देण्यात येणार आहे.

स्पर्धेच्या ओपन डबल्स साठी रु. 800 प्रती जोडी तर लकी डबल्स साठी रु. 400 प्रती खेळाडू फी आहे. सदर स्पर्धा फेदर शटलकॉक वर खेळवली जाईल.

सर्व खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन ग्रुप चे अध्यक्ष राहुलशेठ राठोड, उपाध्यक्ष भूषण इस्वलकर (9028496021) , सेक्रेटरी अभिषेक (राजू) खटावकर (9422542323), खजिनदार तेजस मेहता (8796282337) यांचे तर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *