मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव नजीक दापोलीकडे निघालेली शिवशाही आणि रिक्षाची धडक होऊन भीषण अपघात झाला.
रविवारी (दि ७) सकाळी झालेल्या अपघातात या अपघातात तीनजण ठार झाल्याची माहिती आहे. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, माणगाव येथे हॉटेल मानस या ठिकाणी ठाणेकडून दापोलीकडे निघालेल्या शिवशाहीचा (क्र. एम एच 09 इ एल 8246) आणि रिक्षाचा अपघात झाला.
यामध्ये रिक्षातील तीन प्रवाशी जागीच ठार असल्याचे वृत्त आहे. हा अपघात नेमका कसा झाला याची माहिती मिळू शकली नाही. अपघाताची माहिती मिळतात माणगाव पोलीस घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.
त्या नंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. या अपघातात शिवशाही गाडीतील प्रवासी देखील जखमी झाले आहेत. या अपघाताचा माणगाव पोलीस ठाणे तपास करीत आहेत

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















