खेड : रंगपंचमीला महिलेच्या अंगावर गरम पाणी फेकले

banner 468x60

रंगपंचमीच्या दिवशी अंगणातुन चालत येत असल्याचा राग मनात आणून एका महिलेने अन्य एका महिलेच्या अंगावर हातावर गरम पाणी ओतून शिवीगाळ केल्या प्रकरणी एका महिलेवर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार नांदीवली येथे ३० रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडला. हिरा नारायण कदम वय ५५ असे त्या गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे ३० रोजी सकाळी १०.३० वा चे सुमारास फीर्यादी महिला रंगपंचमी निमित्त वाडीतील आरती शिर्के यांना बोलावण्यासाठी गेली असता

परत येत असताना कदम या महिलेच्या अंगणातुन चालत येत असताना पाहुन कदम या महिलेने त्यांच्या हातामध्ये असणा-या स्टिल भांडयातुन गरम पाणी आणुन ते

फीर्यादीचे डाव्या हातावर ओतुन दुखापत पोहचण्याच्या उददेशाने कृती केली आहे त्यानंतर फिर्यादीला व त्याचे कुटुबातील आई वडिल व भाउ यांना शिवीगाळी करुन दमदाटी केली म्हणुन गुन्हा दाखल झाला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *