Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

कोकण : यंदाचा आंबा हंगाम ‘मे’ अखेरपर्यंत लांबण्याची शक्यता

banner 468x60

फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला आलेला मोहराचे आता फळधारणेत रुपांतर झाल्याने दुसऱ्या टप्प्यातील हापूस आंब्याचे उत्पादन अनुकुल आहे.

बाजारात दरही चांगला मिळत आहे. वाढते तापमानही आंब्यासाठी अनुकुल ठरले असून, झाडावरील आंबा काढण्यासाठी तयार होत आहे. यंदाचा आंबा हंगाम मे अखेरपर्यंत लांबण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील हापूस लागवड क्षेत्रात वातावरण आंब्यासाठी पोषक ठरले आहे.

मध्यंतरी आलेले अवकाळीचे सावट दूर झाल्यानंतर किटकांपासून आंब्याचे संरक्षण करण्यासाठी बागेत फवारण्यांची खबरदारी बागायतदारांनी घेतली. लवकरात लवकर उत्पादन हाती आले तर बाजारात दर चांगला मिळतो असा बागायतदारांचा अनुभव आहे. सध्या बदलत्या वातावरणामुळे या परिसरामध्ये हापूस आंब्याच्या कलमांना मोठ्या प्रमाणात मोहर आलेला आहे.

त्यामुळे प्रत्यक्ष आंबे तयार होण्यास साठ दिवसांचा कालावधी लागणार आहे. हा तयार झालेला आंबा मे महिन्याच्या अखेरीस बाजारात येईल.त्या दरम्यान पावसाची शक्यता असल्यामुळे त्याला दर किती मिळेल याबाबत अनिश्चितता आहे. नव्याने आलेल्या या मोहरावर वातावरणाचा किती परिणाम होतो,

यावर त्यामधून मिळणारे उत्पादन अवलंबून आहे. आवक वाढल्यास दरावर परिणाम जिल्ह्यातील हापूस लागवड असलेल्या गावातून आंबा मोठ्या प्रमाणात बाजारात पाठवला जात आहे.

मात्र सध्यातरी आंब्याचा दर स्थिर असला तरी आवक वाढल्यास दरावर परिमाण होण्याची बागायतदारांची भीती आहे. त्यामुळे पुरवठा आणि काढणी याचा मेळ साधूनच वेगमीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. मुंबई, पुणे या शहरातील बाजारातील पेटीला तीन हजार रुपये दर मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *