Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

रत्नागिरीतील ‘या’ गावांत 144 कलम लागू; पोलिस दलाकडून खबरदारी

banner 468x60

जिल्ह्यात शिमगोत्सवाची (Shimgotsav Festival) धूम सुरू असतानाच मानपान, पूर्ववैमनस्यातून गावात वाद सुरू आहेत.

यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी राजापूर (Rajapur) तालुक्यातील केळवडे, डोंगर या २ गावांमध्ये उत्सव काळात १४४ कलम नुसार मनाई आदेश लागू केला आहे. याशिवाय खेड तालुक्यातील धवडे, चिपळूण तालुक्यातील अलोरे नजीकच्या नांदिवसे, लांजा तालुक्यातील पूनस येथे १४४ कलम लागू करण्याचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे.

कोकणात शिमगोत्सव हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. अनेक गावांच्या हा सण साजरा करण्याच्या पद्धतीही वेगळ्या, अनोख्या आहेत. धूलिवंदनाच्या दिवशी या सणाचा मुख्य पहिल्या टप्प्याची सांगता होते.

गावोगावी हा शिमगोत्सव साजरा करत असताना अनेकदा गावकरी, मानकरी यांच्यात वाद होतात. त्यामुळे उत्सवाच्या आनंदाला गालबोट लागते. गावांत निर्माण होणारे मानपानाचे वाद शिमगोत्सवात आडवे येऊ नयेत, हे वाद सामोपचाराने मिटवण्यासाठी तेथील कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी पोलिसांकडूनही प्रयत्न केले जातात.

मात्र ज्या ठिकाणी वाद मिटवण्यात पोलिसांना यश येत नाही. अशा गावांमध्ये १४४ कलम लागू करण्यात आले आहे. त्यानुसार राजापूर तालुक्यातील केळवडे, डोंगर या २ गावांमध्ये शिमगोत्सवासाठी १४४ कलम लागू केले आहे.

खेड तालुक्यातील धवडे, चिपळूण तालुक्यातील अलोरे नजीकच्या नांदिवसे, लांजा तालुक्यातील पूनस येथे १४४ कलम लागू करण्यासंदर्भात प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. शिमगोत्सवाच्या सणावर विरजण पडू नये, यासाठी पोलिस दलाने ही खबरदारी घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *